Please enable javascript.स्वातंत्र्यसैनिक भास्कर सावे यांचे निधन - Bhaskar save death - Maharashtra Times

स्वातंत्र्यसैनिक भास्कर सावे यांचे निधन

Maharashtra Times 26 Oct 2015, 12:00 am
Subscribe

नैसर्गिक शेतीचे प्रणेते व स्वातंत्र्यसैनिक भास्कर हिराजी सावे (९४) यांचे उंबरगाव येथील राहत्या घरी शनिवारी वृध्दापकाळाने निधन झाले. रविवारी सकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

bhaskar save death
स्वातंत्र्यसैनिक भास्कर सावे यांचे निधन
म. टा. वृत्तसेवा, पालघर

नैसर्गिक शेतीचे प्रणेते व स्वातंत्र्यसैनिक भास्कर हिराजी सावे (९४) यांचे उंबरगाव येथील राहत्या घरी शनिवारी वृध्दापकाळाने निधन झाले. रविवारी सकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

बोर्डी येथील भास्कर सावे गुजरात राज्यातील उंबरगाव येथील देहरी गावातील शेतावर रहात असत. अनेक प्रयोग करून शेतकरी व बागायतदारांना सेंद्रिय शेतीकडे वळविण्याचे प्रयत्न त्यांनी केले. त्यांच्या या प्रयोगशीलतेबद्दल राष्ट्रीय तसेच राज्य पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते.

देहरी येथील नैसर्गिक शेतीची कर्मभूमी असलेल्या कल्पवृक्ष या बागेत त्यांच्यावर रविवारी सकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी बोर्डी येथील आचार्य भिसे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष एन. के. पाटील, स्वाध्याय महादेवभाई, केसरी टुर्सचे संस्थापक केसरी पाटील, उद्योजक अशोक संघवी, मालेगावचे सेंद्रिय शेतीचे पुरस्कर्ते जितुभाई कुटमुटीया, बडोदा येथील सर्वोदय कार्यकर्ते कपिल शहा यांच्यासह देहरी व बोर्डी येथील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
कॉमेंट लिहा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज